भारतीय महिला दृष्टिहीन क्रिकेट संघाने पटकावलं सुवर्णपदक…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

भारतीय महिला दृष्टिहीन क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करत आयबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये सुवर्ण इतिहास रचला आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सुवर्णपदक पटकावल आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून सुवर्णपदक जिंकलं आहे. टीम इंडियाने पहिल्यांदा आयबीएस वर्ल्ड गेम्समध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचा मान पटकावला आहे. या आधी भारताच्या महिला दृष्टिहीन संघाने एकदाही सुवर्णपदक जिंकलं नव्हतं.

https://twitter.com/IBSAGames2023/status/1695432735873970249?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1695432735873970249%7Ctwgr%5Efd3144940d5af243e5b313b8a6cf0d1ccf395b96%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.saamtv.com%2Fsports%2Fibsa-world-games-indian-womens-blind-cricket-team-won-match-against-australia-by-9-wickets-vvg94

भारतीय महिला दृष्टिहीन क्रिकेट संघाने आयबीएस वर्ल्ड गेम्समध्ये जोरदार खेळ दाखवला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून पराभव केला आहे. या स्पर्धेत तिसरा सामना ऑस्ट्रेलियासोबत झाला. या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दमदार विजय मिळवला.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने २० षटकात आठ गडी गमावून ११४ धावा ठोकल्या होत्या. तर टीम इंडियाने ३.३ षटकात १ गडी गमावून ४३ धावा ठोकल्या. सामन्यादरम्यान पाऊस पडल्याने खेळ थांबवावा लागला. मात्र, भारतीय संघाचा रनरेट चांगला होता. त्यामुळे भारतीय संघाची चांगल्या नेट रनरेटमुळे विजेता म्हणून निवड करण्यात आली.

दरम्यान, भारतीय अंध पुरुष क्रिकेट संघाने आयबीएसए स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. तर आता अंतिम फेरीत भारतीय अंध पुरुष क्रिकेट संघासमोर पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. भारतीय महिला दृष्टिहीन संघाने सुवर्णपदक जिंकल्यानंतर पुरुष संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.