टीम इंडिया जागतिक क्रिकेटच्या क्रमवारीत तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क :

 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवत भारतीय संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. भारतीय संघ आता कसोटी, वनडे आणि टी-२० मध्ये नंबर वन संघ बनला आहे. जागतिक क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम करणारा भारतीय संघ हा दुसरा संघ ठरला आहे. याआधी केवळ दक्षिण आफ्रिकेने अशी कामगिरी केली होती. अलीकडच्या काळात, भारताने तिन्ही फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी दाखवली आहे, ज्यामुळे टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचण्यात यशस्वी ठरली.

 

मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयासह भारतीय संघाचे आयसीसी वनडे क्रमवारीत 116 गुण झाले आहेत, तर भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे, पाकिस्तानचे 115 गुण झाले आहेत. एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकाव्यतिरिक्त, भारतीय संघ 118 रेटिंग गुणांसह कसोटीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर टी-20 फॉर्मेटमध्ये भारताचे 264 रेटिंग गुण आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.