उद्या रावेर येथे दिव्यांगांना सहाय्यक साधने व उपकरणांचे वाटप…

0

 

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधनांचे नियमित वाटप करण्यात येत असते. उद्या (२४ सप्टेंबर) रोजी रावेर येथील व्ही एस नाईक महाविद्यालयात सहायक उपकरणांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग यांनी दिली आहे.

खासदार रक्षा खडसे यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आदी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.

रावेर तालुका प्रशासन व जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन व संयोजन करण्यात येत आहे. रावेर तालुक्यात यापूर्वी नोंदणी व तपासणी केलेल्या दिव्यांगासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले. रावेर लोकसभा मतदारसंघातील इतर तालुक्यांसाठी पुढील काही दिवसांत शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. दिव्यांगांनी शिबिरास येताना पूर्व नोंदणी पावती, आधारकार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावेत. असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.