IND विरुद्ध ENG कसोटीमध्ये बुमारहने रचला मोठा इतिहास; ठरला २१ शतकातला पहिला गोलंदाज…

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर यशस्वी जैस्वालने भारतासाठी दमदार कामगिरी दाखवली. त्याने उत्कृष्ट द्विशतक झळकावले आणि 209 धावा केल्या. जैस्वालमुळेच भारतीय संघ पहिल्या डावात 396 धावा करू शकला. यानंतर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. त्याच्यामुळेच इंग्लंडचा संघ 253 धावांत ऑलआऊट झाला.

बुमराहने केली चमकदार कामगिरी…

जसप्रीत बुमराहसमोर इंग्लंडचे फलंदाज टिकू शकले नाहीत आणि त्यांनी अक्षरशः नांग्या टाकल्या. त्याने इंग्लंडविरुद्ध गोलंदाजीचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले. बुमराहमुळेच टीम इंडियाने पहिल्या डावाच्या जोरावर 143 धावांची आघाडी मिळवली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात बुमराहने 6 विकेट घेतल्या आणि 45 धावा दिल्या. 21 व्या शतकातील भारतीय भूमीवर कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाची ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे. बुमराहपूर्वी कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाने भारतीय भूमीवर इतक्या कमी धावा देऊन 6 बळी घेतले नाहीत. त्याने घातक गोलंदाजी करत हा विक्रम केला आहे.

इंग्लंडविरुद्ध ६ विकेट्स

जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फॉक्स, टॉम हार्टली आणि जेम्स अँडरसन यांच्या विकेट घेतल्या आहेत. बुमराहची कसोटी क्रिकेटमधील ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे २७ धावांत ६ बळी. दरम्यान त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत १५० बळींचा टप्पा याच डावात पार केला.

बुमराह-जैस्वाल यांनी ताकद दाखवली

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 396 धावा केल्या. भारताकडून यशस्वी जैस्वालने स्फोटक २०९ धावा केल्या. शुभमन गिलने 34 धावांचे योगदान दिले. भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याच्याशिवाय रजत पाटीदारने 32 आणि श्रेयस अय्यरने 27 धावा केल्या. जॅक क्रॉलीशिवाय इंग्लंडच्या कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. जॅक क्रॉलीने 76 धावा केल्या. क्रोलीशिवाय एकही फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 6, कुलदीप यादवने 3 आणि अक्षर पटेलने 1 बळी घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.