कारखाने मोडीत काढत निवडणुकीच्या तोंडावर महारोजगार मेळावा…

0

 

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

तीन दशकापासून विधिमंडळात बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत असतांना, उद्योग उभारण्या ऐवजी मेटाकुटीस घेऊन जात, नेस्तनाबूत करणारे आता औद्योगिक वसाहतीत जाऊन उद्योजकाना निमंत्रित करत आमच्या बेरोजगारांना आपण सेवेत सामावून घेण्याची विनवणी करीत आहे. हा सर्व खटाटोप करतांना दिसून येत आहे. मागील पाच वर्षा आगोदरही महारोजगर मेळावा झाला होता, तेंव्हा सुद्धा सुशिक्षित बेरोजगारांची अर्जासह कागदपत्रे घेण्यात आली होती. त्यावेळीही अशाच सूचना दिल्या होत्या, मात्र गेली पाच वर्ष झाली अद्यापही त्यातील सुशिक्षित बेरोजगारांना  रोजगार मिळाला हे गुलदस्त्यात आहे.

त्यावेळी विविध कंपन्यांशी करार करण्यात आला होता त्यात किती कंपन्यांनी महारोजगार मेळाव्यातील अर्जदारांना नोकऱ्या दिल्या ? १९९५ पासून आतापर्यंत पाच वर्ष वगळता विद्यमान आमदार डॉ राजेंद्र शिंगणे हे मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहे, अनेकवेळा राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, येनकेनप्रकारे बहुतांश खात्याची जबाबदारी स्वीकारली मात्र वैष्णवी शुगर मिल्स राजेगाव शिवार शेंदुर्जन, सूतगिरणी साखरखेर्डा, जिजामाता सहकारी साखर कारखाना, शंकर नगर दुसरबीड, स्वतः संस्थापक अध्यक्ष असलेला शेतकऱ्यांना फायद्याचा ठरणारा संत चोखा मेळा सोया प्रक्रिया प्रकल्प टाकरखेड भागीले,  विशेष म्हणजे देऊळगाव राजा औद्योगिक वसाहतीत सिनगाव फाट्यावरील कंपन्यांना पूरक असे पाणी पुरेल यासाठी सुद्धा प्रयत्न न करता फक्त नि फक्त भावनेशी निगडित राहून प्रत्येक पंचवार्षिक ला वेगळा मुद्दा शोधून विजयी भवं होत ठराविक मर्जीतील लोकांना लाभदायक ठरणारा हा महारोजगार मेळावा राहणार आहे.

सदर मेळाव्याबाबत माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर हे मुंबई स्थित असतांना महारोजगार मेळाव्याबाबत विचारणा केली असता आतापर्यंत मागील महारोजगार मेळाव्यातील किती तरुणांना सुशिक्षित बेरोजगारांना कोणत्या कंपनीने नोकऱ्या दिल्या? असा प्रतिप्रश्न करत याही वेळेस सुशिक्षित बेरोजगारांची दिशाभूल होणार असल्याचे संकेत असल्याने त्यांना असेच जमते अशीही मार्मिक टिप्पणी केली. ४ फेब्रुवारी महारोजगार मेळाव्याची नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय प्रांगणात पूर्वतयारी होतांना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.