विहिरीत उडी घेऊन हिंगोण्याच्या युवकाची आत्महत्या

0

यावल , लोकशाही न्युज नेटवर्क

विहिरीत उडी घेऊन ३५ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजाराम रमेश भिल्ल (वय-३५ रा. हिंगोणा ता. यावल) ते मयत युवकाचे नाव आहे.

सूत्रांची दिलेली महिती अशी कि , राजाराम रमेश भिल्ल (वय-३५ रा. हिंगोणा ता. यावल) या मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्या तरूणाने हिंगोणा गावाच्या न्हावी मारूळ रस्त्यावरील बेघर वस्ती जवळ असलेल्या ग्रामपंचायत मालकीच्या विहीरीत ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली . आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट शकले नाही. पोलीस पाटील दिनेश बाविस्कर यांनी दिल्याने फैजपुर पोलीस ठाण्यात अकसमात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.