शॉर्ट सर्किटमुळे हाॅटेल साक्षी जळून खाक ; लाखोंचे नुकसान

0

मलकापूर , लोकशाही न्युज नेटवर्क
मलकापूर शहरातील हॉटेल साक्षीला आग लागून संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याचे घटना आज 7 फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.

शहरातील माता महाकाली रोड वरील हॉटेल साक्षीला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली.आग लागताच हॉटेल मालक प्रकाश दाणे यांनी पाण्याच्या साह्याने वीजवण्याचा प्रयत्न केला असता आगीने तांडव रूप धारण करून मोठा पेट घेतला. या आगेत हॉटेल मालक प्रकाश दाणे यांच्या पायाला भाजले. घटनेची माहिती पत्रकार विरसिंह राजपुत,हरी गोसावी यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले असता अग्निशामक दलाचे चालक वासुदेव भोपळे अग्निशमन दलासह तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे शर्यतीचे प्रयत्न सुरू केले. व काही क्षणातच आग आटोक्यात आले व मोठा अनर्थ टळला. या शॉर्ट सर्किट मुळे हॉटेल मधील फ्रिज सहित संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. मात्र या आगी मध्ये सुदैवाने कुठलेही जीवित हानी झाली नाही परंतु हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावेळी आरोग्य अधिकारी योगेश घुगे, अग्निशामक दलाचे चालक वासुदेव भोपळे, सुरेशसिंग राजपूत, संदीप जमोदे, गजानन भातुरकर, सुनील श्रीनाथ, अनिल बगाडे, सुनील बगाडे, दिपक कपले, गोविंदा दाणे, आकाश बोरसे व पोलिस प्रशासनाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी मदत कार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.