सकाळचा नाश्ता टाळताय ?, आरोग्यावर होतील दुष्परिणाम

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार महत्वाचा असतो. यासोबतच आपण कोणत्या वेळेस काय खातोय याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. आजकाल धावपळीच्या दिनचर्येत नाश्ता आणि जेवणाकडे आपले दुर्लक्ष होते. मात्र याचे आपले आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

जेवणासह सकाळचा नाश्ता अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण नाष्ट्यामुळे संपूर्ण दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळून शरीर दिवसभर ताजेतवाने राहते. यावर आपले आरोग्य देखील आवलंबून असते. म्हणून सकाळचा नाश्ता पौष्टिक असावा. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासोबत शरीराला पर्याप्त प्रमाणात ऊर्जा मिळते. तसेच सकाळी लवकर नाश्ता केल्याने चयापचय संबंधित फायदे होतात. म्हणून जर तुम्ही धावपळीच्या जीवनशैलीमुळे सकाळचा नाश्ता टाळत असाल तर तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.

नाश्ता कसा असावा

सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थ, कबरेदके इत्यादी घटकांचा समावेश असावा. आपल्या आहारात तंतू असणं हे फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर आजारांना लांब ठेवण्यासाठीही गरजेचं आहे. यासह अंडी, मासे, दूध या पदार्थात प्रथिने असल्याने चरबी नसलेले पदार्थ तुम्ही नाश्ता म्हणून खाऊ शकता. धान्यातून आणि संपूर्ण धान्याच्या ब्रेडमधूनही संमिश्र कार्बोदके मिळतात. त्यातून शरीराला आवश्यक पोषण मिळते. तसेच दिवसभर भरपूर प्रमाणात पाणी घेतलं पाहिजे.

सकाळचा नाश्ता टाळल्यास ?

सकाळचा नाश्ता टाळल्याने वजन वाढू शकते. दिवसभरातील कामं करण्यासाठी शरीराला ऊर्जेची गरज असते. त्यामुळे सकाळी प्रोटीनयुक्त पदार्थांचा नाश्ता करावा. ज्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळेल. नाश्ता केला नाही तर सतत भूक लागते, त्यामुळे काही तरी खात राहिल्याने वजन वाढू शकते.

सकाळी नाश्ता न केल्यास शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवते. नाश्ता न केल्यास दिवसभर थकवा जाणवू शकतो तसेच ऊर्जेची कमतरता जाणवल्याने कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करणे कठीण होते.

नाश्ता न केल्यास शरीरात प्रोटीनची कमतरता निर्माण होऊन केराटीनची पातळी अनियंत्रित होते, ज्यामुळे केसांची वाढ थांबून केसगळती होऊ शकते.

नाश्ता टाळल्यास डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. नाश्ता टाळल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण अनियंतत्रित होते, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही हॉर्मोन रिलीज केले जातात. ज्यामुळे मायग्रेन, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.