आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – आ. मंगेश चव्हाण

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाच्या चेअरमन पदी चाळीसगावचे आमदार व मुक्ताईनगर तालुक्यातून दुध संघावर निवडून आलेले मंगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी संस्था असणाऱ्या दुध संघाची जबाबदारी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला दिल्याबद्दल मी आमचे नेते गिरीषभाऊ महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानतो. सोबतच मला अनुमोदन देणारे सर्व जेष्ठ – श्रेष्ठ संचालक मंडळ यांचे देखील मनापासून आभार मानतो. दुध संघात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ज्या दुध उत्पादक सभासद मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ अहोरात्र परिश्रम घेऊ. जळगाव दुध संघाचा “विकास” ब्रँड राज्यातील अग्रगण्य करण्यासाठी सर्वाना हेवा वाटेल असा पारदर्शक कारभार आम्ही काम करू.

येत्या आठ दिवसात दुध संघाच्या आजच्या स्थितीचा आढावा घेऊन त्याचा लेखाजोखा सर्वांपुढे मांडण्यात येईल व निश्चितपणे येत्या ५ वर्षात गिरीषभाऊ व गुलाबभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने दुध संघाची अनेक पटींनी प्रगती झालेली आपल्याला दिसेल हा विश्वास नवनिर्वाचित दुधसंघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.