भयंकर : जमीन बळकावण्यासाठी ६ जणांची गोळ्या झाडून हत्या

0

भोपाळ , लोकशाही न्यूज नेटवर्क

मध्य प्रदेशात जमीन बळकावण्यासाठी ६ जणांची गोळ्या झाडून हत्या केल्याची भयंकर घटना मुरैना जिल्ह्यातल्या पोरसा घडली असून हे कृत्य कॅमेऱ्यातही कैद झाले आहे. या घटनेत ५ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हा प्रकार मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यातल्या पोरसा येथील लेपा गावात घडला. या गावात राहणाऱ्या धीर सिंह आणि गजेंद्र सिंह यांच्या कुटुंबात जमिनीवरून 2013 मध्ये वाद झाले होते. यात धीर सिंहच्या कुटुंबातील दोघांची हत्या करण्यात आली होती. त्याचा आरोप गजेंद्रच्या कुटुंबावर होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबात सामंजस्य करार झाला होता.

हा करार झाल्यानंतर गजेंद्र सिंह हा पुन्हा गावात राहायला आला. शुक्रवारी सकाळी धीर सिंहच्या गटाने गजेंद्र सिंहच्या कुटुंबावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. तेवढ्यावर न थांबता त्यांनी कुटुंबाव गोळीबारही केला. या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना पाहणाऱ्यांपैकी काहींनी या घटनेचं चित्रीकरण केलं. तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.