वरणगांव उड्डाण पुलावर भुसावळच्या दापंत्याचा अपघात पती ठार, पत्नी गंभीर जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

वरणगांव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या उड्डान पुलावर चागदेव येथून देव दर्शन घेऊन नेमाडे दांपत्य हे घरी भुसावळ कडे मोटरसायकलवरून जात असताना झालेल्या अपघातात पती जागीच ठार झाले तर पत्नी गभीर जखमी झाल्याची घटना घडली तर शहरातील ढाके दापत्य हे त्यांच्या मार्गावरून भुसावळला जात असताना अपघात स्थळी महिला मदतीचा आक्रोश करीत असल्याचे लक्षात येताच दोघे पती , पत्नी मदतीसाठी धावून जखमींना रुग्णालयात पोहचविले अपघात कसा घडला हे मात्र स्पष्ट झाले नाही

या बाबत वृत असे भुसावळ शहरातील नव महाराष्ट्र स्टोअर्स व टिपटॉप टिव्ही सेंटरचे संचालक ललीत प्रभाकर नेमाडे ( ४८ ) व नीता ललीत नेमाडे ( ४२ ) हे दोघे पती पत्नी शुक्रवार दि ५ रोजी सकाळच्या सुभारास पोर्णीमा असल्याने चांगदेव येथील मंदिरात गेले होते. देव दर्शन आटोपून घरी भुसावळला आपल्या मोटर सायकल क्र एम. एच १९ डी एस ३३५६ ने जात असताना वरणगाव शहरा बाहेरू जाणाऱ्या उड्डाणपूलावर अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नीच्या चोहऱ्याला गंभीर इजा झाली

अपघात झाल्या नंतर बराच वेळ पती पत्नी जागेवर पडून होते . या दरम्यान या मार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असताना कोणीही या अपघातग्रस्तांना लक्ष दिले नाही. मात्र बऱ्याच वेळानंतर जखमी अवस्थेत असलेल्या नीता नेमाडे ह्या मदती साठी आक्रोश करीत असल्याचे वरणगाव येथील मनोज पंढरीनाथ ढाके हे आपल्या पत्नी सोबत त्याच मार्गावरून भुसावळला जात असताना मदती आक्रोश करीत असल्याचे लक्षात येताच अपघातग्रस्तांना मदतीसाठी धाव घेऊन वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये घटनेची माहिती देत ग्रामीण रुग्णालयात पोहचविण्यासाठी मदत केली

अपघाताचे कारण अस्पष्ट

सदर अपघात कसा घडला हे अस्पट असुन अपघातातील मयत व्यक्ती च्या डोक्याचा भागाला जबर धडक किंवा फटका बसला असल्याने चेहरा पुर्ण छिन्न विछिन्न अवस्थेत होता तर दुसऱ्या महिला जखमीच्याही चेहऱ्याला गंभिर दुखापत झाली आहे तर अपघातग्रस्त मोटर सायकलीचे साईड ग्लास तुटल्याने हा अपघात कसा घडला हेअद्याप अस्पष्ट आहे. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला जखमी निता ललित नेमाडे यांच्या खबरी वरूण अपघाताची नोंद करण्यात आली असुन घटने चा पुढील तपास उप निरीक्षक किशोर पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.