भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत पाकिस्तानला फटकारले

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

शांघाय सहकार्य संघटनेच्या (Shanghai Cooperation Organisation) परराष्ट्र मंत्र्यांची आज, शुक्रवारी गोव्यात बैठक होत आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर  यांनी सर्व सहयोगी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचे स्वागत केले. आजच्या या बैठकीत जुलैमध्ये होणाऱ्या बैठकीतील अजेंडा निश्चित करण्यात येणार आहे. याशिवाय १५ करारांनाही अंतिम स्वरुप दिलं जाणार आहे. तसेच चार नवे भागीदारही यात सहभाग दर्शवणारी आहेत.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांची सध्या तरी जोरदार चर्चा होत आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर जे हि पाहुणे आलेत त्यांना नमस्कार करून पुढे पाठवत होते पण जसे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) आले तेव्हा जयशंकर यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्याशी हस्तांदोलन न करता लांबूनच त्यांना नमस्कार केला. यावेळी त्यांनी बैठकीला संबोधित करताना दहशतवादाचा मुद्दा उचलून धरला. सीमेपलीकडील दहशतवाद पूर्णपणे संपुष्टात आला पाहिजे. त्यांना होणारा निधी पुरवठा रोखला पाहिजे, अशा खोचक शब्दांत त्यांनी पाकिस्तानचा थेट नाव न घेता फटकारले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.