हरियाणात राजकीय भूकंप ! मुख्यमंत्री खट्टर यांचा राजीनामा

0

हरियाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात हरियाणाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.  मनोहर लाल खट्टर यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे.

युती तुटली

लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात भाजप-जेजेपी युती तुटली आहे. चंदीगडमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. तर आता हरियाणात भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार आहे. तर आता मुख्यमंत्रिपदासाठी नायब सैनी आणि संजय भाटिया यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.

धक्कातंत्राचा वापर 

भाजपने हरियाणात धक्कातंत्राचा वापर करत एक हाती सत्ता आणण्याचा मार्ग मोकळा केला आहे. येथे जागा वाटपावरून जननायक जनता पक्ष आणि भाजपमध्ये चर्चा निष्फळ ठरल्याने मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी संपूर्ण मंत्रिमंडळासह राजीमाना दिला आहे. यामुळे येथे आता नवे सरकार स्थापन होणार आहे. यात जननायक जनता पक्ष नसणार आहे.

हरियाणात विधानसभेच्या ९० जागा आहेत. सध्या ९० जागांपैकी भाजपकडे ४१, काँग्रेसकडे ३०, आयएनएलडीकडे १०, एचएलपीकडे १ आणि ७ अपक्ष आहेत. हरियाणात ४६ आमदारांची गरज आहे. अशा स्थितीत हरियाणात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४१ जागा मिळाल्या होत्या, तेव्हा त्यांनी जेजेपीच्या १० आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते. जेजेपीसोबत युती केल्यानंतर दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.