सोन्याच्या भावात विक्रमी वाढ, जाणून घ्या आजचे भाव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात प्रचंड वाढ होतांना दिसत आहे. या महिन्यात तर सोन्याने नवा विक्रम केला आहे. लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

गेल्या ११ दिवसांत सोनं तब्बल ३ हजाराहून अधिक रुपयांनी महागले आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, १० ग्रॅम सोन्याची किंमत ६८० रुपयांनी वाढून ६५,६३५ रुपयांवर पोहोचली आहे. १ मार्चला सोन्याची किंमत प्रतितोळ्यासाठी ६२,५९२ रुपये इतकी होती. तर ७ मार्च रोजी सोन्याने ६५ हजारांचा टप्पा ओलांडला होता. तर चांदीच्या किमतीत प्रतिकिलो ६९,९७७ रुपयांवरुन ७२,५३९ वर पोहोचले आहे. मागच्या वर्षभरात ८,३७९ रुपयांनी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. लवकरच सोन्याच्या भाव ७० हजारांपर्यंत पोहोचू शकते.

 सोन्याचे भाव का वाढताय ? 

मिळालेल्या माहितीनुसार २०२४ मध्ये जगभरात आर्थिक मंदीचे संकेत येण्याची शक्यता आहे. लग्नसराईमुळे सोन्याच्या दरात वाढलेली मागणी. डॉलर इंडेक्समध्ये दिसत असेलली कमकुवतपणा आणि जगभरातील केंद्रीय बँकाचा खरेदीचा धडाका. २०२३ च्या सुरुवातीला सोने प्रतितोळा ५४,८६७ रुपये इतके होते.

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,०८९ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या  भावात १० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६६,४१० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात १०० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी७५,५०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार १०० रुपयांनी घसरण झालीये.

२४ कॅरेटनुसार सोन्याचा आजचा भाव 

जळगाव – ६६,०७० रुपये

मुंबई- ६६,२६० रुपये

पुणे – ६६,२६० रुपये

नागपूर – ६६,२६० रुपये

नाशिक – ६६,३१० रुपये

ठाणे – ६६,२६० रुपये

अमरावती – ६६,२६० रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.