भोजे येथे तरूण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0

पाचोराः – तालुक्यातील भोजे येथे एका ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊ आत्महत्या केल्याचे घटना उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

संदिप श्रीकृष्ण पवार (वय ३५) रा. भोजे ता. पाचोरा यांचा १० मार्च रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास नविन प्लॉट मधील शेडमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. संदिप पवार यांना तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी संदिप पवार यांना मृत घोषित केले.

 

घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत संदिप पवार यांच्या पाश्चात्य आई, वडील, पत्नी, दोन मुलं, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. संदिप पवार यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल का उचलले ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचा पुढील तपास पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.