अंतुर्ली फाट्याजवळ अज्ञात वाहनांच्या धडकेत तरुण ठार

0

पाचोरा : पाचोरा ते भडगाव रोडवरील अंतुर्ली फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल वरील एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना १० रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्यासह घटनास्थळी दाखल होवून – दोघांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोपान उत्तम जोशी (वय ३०) ■रा. शेंगोळा ता. जामनेर व नितीन गुलाब जोशी (वय ३०) रा. वनगाव पोहरी ता. सोयगाव हे १० मार्च रोजी होंन्डा युनिकॉन मोटरसायकल क्र. एम. एच. ०२- डी. डी. ८५९४ ने जामनेर येथे त्यांचे नातेवाईक गजानन जोशी यांच्या मुलाचा साखरपुडा असल्याने तेथे दुपारी २ वाजता आले होते. साखरपुडा सोहळ्यात सहभागी होवुन सोपान जोशी व नितीन गुलाब जोशी हे रात्री १० वाजेच्या सुमारास जामनेर येथुन भडगाव ला खाजगी कामानिमित्त जाण्यासाठी निघाले.

दरम्यान पाचोरा ते भडगाव रोडवरील अंतुर्ली फाट्याजवळ त्यांच्या मोटरसायकलला समोरुन अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात सोपान जोशी यांचा जागेवरच मृत्यू झाला तर नितीन जोशी हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पी. एस. आय. सुनिल पाटील, पोलिस कॉन्स्टेबल योगेश पाटील, संदिप भोई, योगेश पाटील, प्रकाश शिवदे, सचिन पवार हे रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्यासह घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता सोपान जोशी यांना वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. तर नितीन जोशी यांना जळगांव येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटनेप्रकरणी मयत सोपान जोशी यांचे भाऊ ज्ञानेश्वर उत्तम जोशी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.