जीवन सुखी करणारे हनुमंत चरित्र : पंडित पुष्पनंदन महाराज

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

श्री हनुमंताच्या दिव्य अलौकिक शक्तीचा परिचय नव्या पिढीला व्हावा तसेच त्यांच्या जीवन चरित्रातून बोध घेऊन तरुण वर्गाला प्रेरित करणे, बल व बुद्धिमत्तेचे जीवनातील महत्त्व समजावून घेत श्री हनुमंताला महावीर म्हणून का संबोधले जाते. अशा तेजस्वी हनुमंत अवताराची महती पटवून देण्यासाठीच या तीन दिवसीय हनुमंत चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच चिंता भय यापासून मुक्ती देऊन कष्टमय जीवनाला सुखी करणारे श्री हनुमान चरित्र सदैव प्रेरणादायी असल्याचे उद्बोधन पंडित पुष्पनंदन यांनी आज कथेच्या प्रारंभी प्रथम पुष्प गुंफतांना केले.

कथेतील पहिल्या दिवसाच्या महाआरतीचा मान पांढरा पोळ संस्थेचे अध्यक्ष विजय काबरा यांना देण्यात आला. दुपारी दोन तीस वाजता पांजरा पोळ संस्थान येथे महिलांच्या भव्य कलश यात्रेने कथाकार पंडित पुष्पनंदन महाराजांचे भव्य स्वागत करण्यात आले.

यात धर्म सेवा महिला मंडळ, जळगाव शहर तालुका माहेश्वरी महिला मंडळ, सिखवाल ब्राह्मण समाज महिला मंडळ, संस्कार परिवार, माहेश्वरी गो सेवा संघ,सहभागी झाले होते. प्रभू रामचंद्र व श्री पवनपुत्र हनुमानाचा जयघोष करीत निरुपणकार पं. पुषप्नंदन महाराज यांचेवर पुष्प वर्षाव करीत त्यांना या भव्य स्वागत यात्रे तून कथा स्थळावर गाजत वाजत नेण्यात आले.

कथास्थळी पं. पुष्प नंदन यांना स्थानापन्न करण्या अगोदर श्री रामायण व श्री हनुमंत चालीसा ग्रंथाचे पूजन ओमप्रकाश जाजू परिवारातर्फे करण्यात आले. तसेच अध्यक्ष विश्वनाथ जोशी, सुरेश कोठारी, दिलीप व्यास, दीपक लढ्ढा, गोपाळ पंडित, चंदू पंडित, मुरली चांडक यांच्या हस्ते हनुमंत कथेचे निरुपणकार पं. पुष्प नंदन यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात पहीलेदिवशी प्रथम पुष्प सादर करीत असताना श्री हनुमंताच्या रंजक कथेतील विविध लीला व अवतार कार्याची माहिती भाविक भक्तांना पं. पुष्पा नंदन जी महाराज यांनी दिली. यादरम्यान कथा सुरू असतांनाच सायंकाळी सजीव आकर्षक आरासी तून बाल रूपातील श्री हनुमंताच्या जन्म उत्सव कार्यक्रमाने वातावरणात रंगत भरली. या प्रसंगी श्री हनुमंताचे हे बाल रूप पाहून भाविक भक्त यांनी जयघोष केला. नमित अमित धूत याने ही बाल हनुमंताची सजीव भूमिका साकारली. ही सजीव आरास उभारणी कामी जळगाव शहर तालुका माहेश्र्वरी महिला मंडळ यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.