पद्मालय गणपती देवस्थान परिसराचा कायापालट होणार

0

 

लोकशाही विशेष लेख

 

जळगाव पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन्ही सोडण्याचे गणपती मंदिर अति प्राचीन व जगातील एकमेव मंदिर होय. पांडवकालीन ऐतिहासिक पार्श्वभूमी या मंदिराला लाभलेली आहे. एकाच ठिकाणी डाव्या आणि उजव्या सोंडेचे दोन गणपतीची मूर्ती असलेले जगातील एकमेव मंदिर असलेली आख्यायिका आहे. प्राचीन काळात मंदिराचे हेमाडपंथी बांधकाम झालेले आहेत. उंच डोंगर माथ्यावर असलेल्या या मंदिरासमोर असलेल्या तलावात कमळाची फुले असल्याने या तलावाला पद्मालय असे संबोधले जाते. गेल्या दहा वर्षापासून मंदिराला विश्वस्त मंडळाची अध्यक्षपदाची धुरा जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी स्वीकारल्यापासून मंदिर परिसराच्या विकासाला गती आली आहे. त्यामुळे चतुर्थी, संकष्ट चतुर्थीला येथे भाविकांची मोठी गर्दी होऊन जणू त्याला यात्रेचे स्वरूप येते. दर मंगळवारी सुद्धा भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. पद्मालय गणपती मंदिराविषयी असलेले ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व भाविकांना नव्याने सांगण्याची गरज नाही तथापि पद्मालय गणपती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जळगावच नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक येतात. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची सोय सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न विद्यमान विश्वस्त मंडळ करते आहे. तथापि पद्मालय देवस्थान परिसरात भाविकांसाठी आणखी सुख सुविधा उपलब्ध करण्यासाठी ज्या आर्थिक मर्यादा होत्या त्या शासनाने पद्मालय देवस्थान तीर्थक्षेत्राचा ब वर्गाचा दर्जा दिल्याने आता मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी विश्वस्तांना शक्य होणार आहे. पद्मालय देवस्थान तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा जाहीर केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन केले पाहिजे. पद्मालय गणपती देवस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी उद्योगपती अशोक जैन हे विराजमान झाल्यापासून मंदिर परिसरात विविध सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आता ब वर्ग दर्जा प्राप्त झाल्यानंतर दुधात साखर म्हणता येईल. त्यानंतर परिसरा सोबतच मंदिराच्या दक्षिणेला एक किलोमीटर अंतरावर असलेल्या भिमकुंडाला सुद्धा ऐतिहासिक महत्त्व आहे. पद्मालय गणपती मंदिरात गणपती दर्शन घेणाऱ्या भाविकांना भिमकुंडापर्यंत जाऊन ते पाहण्यासाठी एक किलोमीटरचा रस्ता चांगल्या स्वरूपात होण्याची गरज आहे. भिमाने बकासुराचा वध करून येतील गाडीभर अन्नाचे सेवन केल्यानंतर तेथे पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते जेवणानंतर भीमाला तहान लागली होती. त्यासाठी डोंगरातील खडकावर लाथ मारली आणि तेथे खड्डा पडला. या खड्ड्यात पाणी आले. त्या खड्ड्यातील पाणी पिऊन भीमाने आपली कृष्णा भागवली. ज्या ठिकाणी खड्ड्यावर लाथ मारली आणि पाणी काढले तो खड्डा म्हणजे भिमकुंड होय. अशा प्रकारे या भिमकुंडाची आख्यायिका आहे. आज अनेक भाविक या कुंडाच्या ठिकाणी येऊन भीमकुंडाचे सुद्धा दर्शन घेतात. पद्मालय देवस्थानास अध्यात्मिक महत्त्व असले तरी भाविकांसाठी हे पर्यटनाचे स्थळ म्हणून त्याचे महत्त्व जाणले पाहिजे. गेल्या दहा वर्षात या मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मंदिर परिसराचा आणखी विकास झाला आणि भाविकांना राहण्याची चांगली सुविधा उपलब्ध झाली, तर मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची गर्दी वाढेल यात शंका नाही.

 

चतुर्थी संकष्ट चतुर्थीला तर येथे आता यात्रेचे स्वरूप असते. मंगळवार आणि इतर दिवशी सुद्धा भावी सोयीनुसार येत असतात देवस्थान स्थळी विशेषता गणपती मंदिर परिसरात गणपतीच्या साक्षीने शुभ कार्य करण्यासाठी भाविकांचा कल असतो. त्यामुळे या ठिकाणी लग्न कार्य करण्यासाठी चांगली व्यवस्था झाली तर लग्नसराईत लग्न कार्य करणाऱ्यांची संख्या वाढू शकते. त्यामुळे या दृष्टीने विश्वस्त मंडळाकडून तशी सुविधा केली गेली तर देवस्थानाचे उत्पन्न वाढू शकते. मंदिर परिसरात राहण्यासाठी चांगल्या खोल्या हॉल निर्माण केल्या तर तेथे भाविक राहू शकतात. त्यामुळे जळगाव जिल्ह्याचे अर्थशास्त्र सुद्धा बदलू शकते. अनेक व्यावसायिकांचा व्यवसाय वाढू शकतो. देवाला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी भाविक करतात. अशा अनेक छोट्या छोट्या व्यवसायिकांचे व्यवसाय वाढवू शकतील. या सर्वांचा परिणाम जगातील एकमेव असलेल्या दोन छोटेच्या गणपतीचे महात्मे देशात पसरेल आणि पद्मालय गणपती मंदिर देवस्थानाला कायमस्वरूपी भाविकांची गर्दी वाढू शकेल. अमळनेरचे मंगळ ग्रह मंदिर सुद्धा दोन वर्षांपूर्वी असेच दुर्लक्षित होते. १९९९ पासून नवीन विश्वस्त मंडळ कार्यरत झाल्यानंतर अमळनेरचे मंगळ ग्रह मंदिर परिसराचा कायापालट झाला आहे. देशात उज्जैन नंतर अंमळनेरचे एकमेव मंगळ ग्रहाचे मंदिर असल्याने भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच दिवसेंदिवस या मंदिराचा कायापालट झाल्याने प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाण्यासोबतच अंमळनेर आता मंगळ ग्रह मंदिरामुळे ही अधिक ओळखले जात आहे. गणपती मंदिराचे सुद्धा महत्त्व वाढू शकते. त्यासाठी पद्मालय गणपती मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाला शुभेच्छा. आता झपाट्याने मंदिराच्या परिसराचा कायापालट होईल यात शंका नाही…!

Leave A Reply

Your email address will not be published.