धोका देऊ नका सरळ रहा, गुलाबराव पाटलांचा इशारा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची जळगाव लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृहावर झाली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ठणकावले. निवडणुका आल्या की इकडून तिकडे जाणाऱ्यांची संख्या बरीच असते, मात्र ज्यांना जायचं असेल त्यांनी सरळ जावे धोका देऊ नका. आणि राहायचे असेल तर सरळ रहा.  यावेळी जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख सुनील चौधरी, आमदार किशोर पाटील, जिल्हाप्रमुख निलेश पाटील, सरिता माळी- कोल्हे, शहर संघटक ॲड.दिलीप पोकळे, ज्योती चव्हाण आदी उपस्थित होत्या.

 बळी पडू नये

तसेच यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, विरोधकांकडे सध्या बोलण्यासारखं काहीच नाही, त्यामुळे समाज या नावाचे ते भांडवल करतील. कार्यकर्त्यांनी मात्र त्याला बळी पडू नये. आजही ८० टक्के मराठा समाज आपल्या सोबत आहे. पाच वर्ष ही मंडळी कुठेच नव्हती, पण आता दिशाभूल करण्याचे काम करीत आहे. आम्ही माणूस म्हणून काम करतो हेच लोकांना पटवून द्या. आम्ही अधिकाराने तुमची कामं करतो, त्याच अधिकाराने तुम्ही आता आमची कामे करा. आता प्रत्येक मतदारसंघात कसरत सुरू आहे. पहिल्यावेळी निवडून येणार सोपं आहे.दुसऱ्या वेळी कठीण आहे तर तिसऱ्या वेळी महाकठीण आहे.

तिघांची कामेही चांगली 

तसेच अमुक जागा आपल्या पक्षाला सोडावी किंवा अमुक जागेवर एखाद्याने निवडणूक लढवण्याची अपेक्षा करणे यात गैर काहीच नाही. शेवटी निर्णय हा पक्षश्रेष्ठ घेणार आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षाचे पूर्वी तीन आमदार होते आणि आजही तीन आहेत. या तिघांची कामेही चांगली आहेत, त्यामुळे पक्षाला चांगली संधी आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय पक्षाचा आढावा घेण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.