मुंबईत ATS ची मोठी कारवाई, 6 जणांसह 3 बंदुका, 36 जिवंत काडतुसे जप्त

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दहशतवाद विरोधी कारवाया सुरु आहेत. दहशतवादविरोधी पथक मुंबई युनिटने मुंबईतील बोरिवली  परिसरातील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकून 6 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 3 बंदुका आणि 36 जिवंत काडतुसे जप्त केली आहे.

अटक करण्यात आलेले सर्वजण दिल्लीचे रहिवासी आहेत. बोरिवली येथील एलोरा गेस्ट हाऊसमधून तीन बंदुका आणि 36 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये एक विदेशी बनावटीचं पिस्तुल आहे. दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ही कारवाई केली असून मुंबईत खळबळ माजली आहे.

https://x.com/ANI/status/1743911400140100086?s=20

सर्व आरोपी दिल्लीचे असल्याची माहिती समोर आली असून आरोपी मोठा कट रचत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्याम आरोपींमध्ये एकावर हत्या तर दुसऱ्यावर दरोड्याचा गुन्हा आहे. आरोपीं कस्तुरबा मार्ग पोलिसांकडे सोपवण्यात आलं असू पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.