कारमधून चोरट्याने लॅपटॉप लांबविला

0

जळगाव ;-  चार चाकी वाहनातून लॅपटॉप चोरी केल्याची घटना शहरातील दाणा बाजारातील एसएसडी ड्रायफ्रूट दुकानासमोरशुक्रवारी ५ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ६ रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दर्शन ईश्वर चोरडिया (वय-२४, रा. वीरदर्शन नगर, जळगाव) हा तरुण दाणाबाजार येथे एसएसडी ड्रायफ्रूट नावाचे दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी ५ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्यांनी त्यांची चारचाकी गाडी दुकानासमोर लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या चारचाकी वाहनातील बॅगेत ठेवलेला लॅपटॉप चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दर्शन चोरडिया यांनी सर्वत्र शोध घेतला, त्यांनी शनिवारीजळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिलीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बशीर तडवी हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.