सोन्याच्या भावाने नोटबंदी आणि कोरोना काळातील मोडला उच्चांक !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या सर्वत्र लग्न सराईचा मौसम असल्याने सोन्याच्या दरात १५ रोजी जळगावात सर्वाधिक दर पातळी गाठली होती . काल सोन्याचे भाव प्रति १० ग्राम ५६ हजार ४८० दर असताना सोन्याच्या भावात आज सोमवार १६ रोजी १५० रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर प्रति १० ग्राम ५६ हजार ६३० इतके जाऊन पोहचले . तर चांदीच्या दरातही वाढ झाली असून चांदी १५ जानेवारी रोजी ६९ हजार ४३० रुपये होते . तर आज १६ रोजी यात ७८० रुपयांची वाढ झाल्याने चांदीही भाव खात आहे.

नोटबंदी आणि कोरोना काळातही सोन्याचे दर एवढे वधारले नव्हते. तेव्हाचा रेकॉर्डही आज सोन्याने मोडला आहे. सोन्याची किंमत पाहूनच अनेकांना घाम फुटेल. सोन्याच्या दराने आज आणखी एक नवा रेकॉर्ड केला आहे. वायदा बाजारात आज सोन्याचे दर 56,541 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोमवारी १६ जानेवारी रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 0.31 टक्क्यांनी वधारला आहे. तर चांदीच्या दरात आज 0.71 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

GST आणि RTGS च्या किंमती पकडून 999 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 57,800 रुपयांवर पोहोचली आहे. त्दागिन्यांवर GST लागून सोन्याच्या किंमती आणखी वाढल्या आहेत. वायदा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे भाव 173 रुपयांनी वधारुन 56 हजार 494 रुपये झाले आहेत. तर 10 ग्रॅम सोन्याच्या किंमती वाढल्याने 22 आणि 18 कॅरेटचेही दर वाढले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना हा मोठा धक्का आहे. चांदीच्या दरातही 496 रुपयांनी वाढ झाली असून दर 69,923 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीचा व्यापार आज 69,500 रुपयांवर सुरू झाला होता. आता 70 हजारच्या जवळपास चांदीचे दर पोहोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीचे दर वधारले. आज सोन्याचा भाव 0.27 टक्क्यांनी वाढून 1,925.65 डॉलर प्रति औंस झाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 0.79 टक्क्यांनी वाढून 24.46 डॉलर प्रति औंस झाला. गेल्या 30 दिवसांत सोन्याच्या दरात 7.45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर या काळात चांदीच्या दरात 5.57 टक्क्यांची वाढ झाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.