तुळशी विवाहानंतर सोनं महागलं ! जाणून घ्या आजचे नवे दर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तुळशी विवाहानंतर लग्न तसेच धार्मिक विधीच्या शुभमुहूर्तांना सुरुवात होते. यासाठी सोने चांदी खरेदीची लगबग सुरु होते. तसेच गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. कधी सोने महाग तर कधी स्वस्त होत आहे. बुधवारी सोन्याच्या भावात घसरण दिसून आली होती तर चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. मात्र आज सोने चांदीच्या भावात तेजी दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,360 रुपये तर 24 कॅरेटसाठी 51,670 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 617 रुपये आहे.

24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव

चेन्नई – 52,530 रुपये

दिल्ली – 51,770 रुपये

हैदराबाद – 51,670 रुपये

कोलकत्ता – 51,670 रुपये

लखनऊ – 51,670 रुपये

मुंबई – 51,670 रुपये

नागपूर – 51,690 रुपये

पुणे – 51,690 रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.