प्रतापगडावरील अफजल खानच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम हटवलं

0

सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

प्रतापगडाच्या  (Pratapgad) पायथ्याजवळ असलेल्या अफजल खानच्या थडग्याजवळचं (Pratapgad Afzal Khan Tomb) अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात रातोरात हटवण्यात आलं आहे. त्यानंतर या ठिकाणी जमावबंदीचं कलम 144 लागू करण्यात आलं आहे. यावेळी चार जिल्ह्यातले 1500 हून अधिक पोलीस प्रतापगडावर दाखल झाले आहेत.

परिसरात फिरण्यास मनाई 

अतिक्रमण पाडण्यासाठी बुधवारी रात्रीपासूनच जोरदार तयारी सुरू झाली होती. शिवप्रताप दिनी (Shiv Pratap Day) अवतीभोवती हजारोंच्या संख्येने शिवभक्त महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुकामध्ये दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी कोणासही प्रतापगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यास मनाई केली आहे.

144 कलम लागू 

144 कलम लागू केल्यामुळे कोणीही किल्ले प्रतापगडच्या परिसरात फिरल्यास त्यावर कडक कारवाई केली जात असल्याने परिसरात तणापूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीच्या जवळील बांधकाम बुधवारी रात्रीपासून पाडण्यास सुरू केल्याने प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात आली.

1500 पोलिसांचा बंदोबस्त

प्रतापगडावरील अफजल खानच्या कबर परिसरात झालेले अतिक्रमण बुधवारी पहाटे तब्बल 1500  पोलिसांच्या चोख बंदोबस्तात हटवण्यात आले असून परिसरात 144 कलम जारी करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी अतिशय गोपनीय पद्धतीने ही मोहीम राबवली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त पराक्रम म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानचा कोथळा काढल्याचा इतिहास आहे. आजही त्याची साक्ष म्हणून अफजल खानची कबर आहे. मात्र गेल्या काही वर्षात त्या परिसरात इतर काही प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. यामुळेअनेकदा वाद – प्रतिवाद सुरू होता.

Leave A Reply

Your email address will not be published.