सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट, काय आहे कारण ?

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

भारतीय टेनिसपटू (Indian Tennis Player) सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू (Pakistan Cricketer) शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यातमध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता यांचा घटस्फोट झाला असून यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या जवळच्या एका व्यक्तीने सानिया आणि शोएब यांच्या नात्याबाबत चर्चावर शिक्कामोर्तब करत ते दोघेही विभक्त झाल्याचं सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली होती. सानियाच्या या पोस्टवरून शोएबसोबतच्या तिच्या नात्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा सुरु झाली होती.

बऱ्याच काळ एकमेकांपासून वेगळे

शोएब मलिकच्या जवळच्या सहाय्यकाने याबाबत सांगितलं आहे की, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक बऱ्याच काळ एकमेकांपासून वेगळे राहत होते. आता दोघांनी औपचारिकरित्या घटस्फोट घेतला आहे. शोएब मलिकच्या पाकिस्तानातील व्यवस्थापन संघाचा सदस्य असलेल्या व्यक्तीने हा खुलासा केला आहे.

 घटस्फोटाचं कारण ?

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, शोएब मलिक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तांनुसार, शोएब मलिक सध्या एका दुसऱ्या तरुणीला डेट करत आहेत. यामुळेच सानियाने शोएबपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. पण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सानिया मिर्झाची भावूक पोस्ट

काही दिवसांपूवी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली होती. सानियाने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती. याशिवाय सानियाने तिचा मुलगा इजहानच्या वाढदिवसाला इजहानचा फोटो शेअर केला होता. पण शोएबचा नाही. तेव्हाचा या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं स्पष्ट झालं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.