Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»ड्रायव्हरला झोप लागल्याने झाला असावा अपघात – गिरीश महाजन
    गुन्हे वार्ता

    ड्रायव्हरला झोप लागल्याने झाला असावा अपघात – गिरीश महाजन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 1, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बुलढाणा ;- बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघातसमृद्धी महामार्गावर झाला असून अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बसने पेट घेतल्याने या प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीष महाजन यांनी अपघात स्थळाची पाहणी केली. तसेच जखमींची विचारपूस केली.घटनास्थळावर राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी सकाळी 10:45 वाजता भेट दिली. तसेच अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली.

    याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ना. गिरीश महाजन म्हणाले की, “ड्रायव्हरला झोप आल्याने अपघात झाला असावा, यामुळे बस पोलवर जाऊन आदळली, असे आम्हाला समजते आहे. परंतू, ड्रायव्हरचे म्हणणे आहे की टायर फुटला आहे. याचा तपास केला जाणार आहे. कारण रस्त्यावर कुठेही टायर फुटल्याचे किंवा घसरल्याचे पट्टे दिसत नाहीत. यामुळे क्लिअरकट ड्रायव्हरला झोप लागली आणि बस पोलावर आदळल्याचे दिसत आहे. या अपघातात ड्रायव्हर, कंडक्टर यांना साधे खरचटलेलेही नाही.”पुढे ते म्हणाले, “वेग देखील अपघाताचे कारण असून . रस्ता चांगला आहे, परंतू वेगावर नियंत्रण आणायला हवे. यासाठी चालकांचे काऊंसेलिंग करावे लागणार आहे. १८०-२०० च्या वेगाने गाडी चालविणे धोक्याचे आहे. यामुळे अपघात होणारच. हे अपघात कसे रोखले जाईल यावर काम केले जाईल. ड्रायव्हर, कंडक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जाणार आहे.” या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पाहणी करणार आहेत.

    दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळील समृद्धी महामार्गावरुन विदर्भ ट्रॅव्हल्सची MH 29 BE – 1819 क्रमांकाची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. यादरम्यान मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हा अपघात इतका भयानक होता की, मृतदेहाची ओळख पटणेही अवघड आहे.

    दरम्यान, ही बस यवतमाळची विदर्भ ट्रॅव्हल्स होती. ज्यात 33 प्रवासी होते. यातील 26 प्रवासी जळून खाक झाले आहेत. समृध्दी महामार्गावर झालेल्या अपघातासंदर्भात खासगी बसमधील जखमी / मृतक प्रवाशांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी बुलढाणा कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग मोबाईल क्र.7020435954 व 07262242683 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    #crime buldhana accident girish mahajan jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif