फ्रान्समधील सर्वात मोठे वाचनालय आंदोलकांनी जाळले !

0

 

पॅरिस ;- पोलिसांच्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर फ्रान्स धुमसत असून . फ्रान्समधील परिस्थिती आता अनियंत्रित झाली आहे. आंदोलकांनी फ्रान्समधील सर्वात मोठे सार्वजनिक वाचनालय जाळल्याचे समोर येत असून ज्ञानाचा खजिना खाक झाला आहे.

शुक्रवारी रात्री फ्रान्समध्ये आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांसह मोठ्या इमारती आणि खासगी वाहनांना आग लावली. यावेळेस दुकानांची देखील तोडफोड करत लुटमार करण्यात आली. आंदोलकांनी देशातील अनेक बँका लुटल्या. यावेळी आंदोलकांनी देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वाचनालयाला देखील आग लावली. या दंगलीत आतापर्यंत 875 जणांना अटक करण्यात आली असून 200 हून अधिक पोलीस यात जखमी झाले आहेत.

मंगळवारी रात्री पहिल्यांदा दंगल उसळली तेव्हा चकमकीत 40 कार जाळल्या आणि 24 पोलीस अधिकारी जखमी झाले. आता फ्रान्समधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. यामध्ये दंगलखोर मार्सेली शहरातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वाचनालयाला आग लावताना दिसत आहेत. फुटेजमध्ये इमारतीच्या आत आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. हे ज्ञान, संस्कृती आणि सामुदायिक संसाधनांचे ‘नुकसान’ असल्याच्या प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर लोकांनी निषेध व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.