“येत्या ८ दिवसात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता”- गिरीश महाजन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत पुन्हा मोठे भाकीत वर्तवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी या अगोदर देखील भाकीत वर्तवला आहे. त्यांनी गेल्यावेळी असं भाकीत केल्यानंतर काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. तसेच काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. या तिन्ही घटना महाराष्ट्रातील जनतेसाठी अनुपेक्षित होत्या, त्यानंतर येत्या आठवड्यात पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात स्फोट होणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया पुन्हा उंचावले आहे.

काय म्हणाले गिरीश महाजन?
“मी मागच्या वेळेस सांगितले होते स्फोट होणार आहे. त्यावेळी काँग्रेसमध्ये स्फोट झाला. याबाबत त्यांचे कौटुंबिक संबंध आहे ते दिवाळी दसरा सणात कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र येत असतात. त्यामुळे ती कौटुंबिक भेट असेल”. सुप्रिया सुळे आणि अजित दादा भेटी संदर्भात अजित दादा सांगू शकतील. राज्यात आठ दिवसात पुन्हा स्फोट होण्याची शक्यता आहे. असेही भाग गिरीश महाजन यांनी वर्तन आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.