श्री वानखेडे गुरुजी हौसिंग सोसायटीत ‘गुरू रविदास जयंतीस’ बांधवांचा प्रतिसाद

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथील नेरी नाक्याजवळ असलेल्या श्री.वानखेडे गुरुजी हौसिंग सोसायटीतील संत रोहिदास समाज मंदिर सभागृहात गुरू रविदास यांची 647 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख म्हणून अतिथी जळगाव चे आमदार राजुमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, भुसावळचे आमदार संजय सावकारे, जिल्हा शिवसेना प्रमुख विष्णू भंगाळे, नगरसेविका सुरेख तायडे, चर्मकार विकास संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ सावकारे, संजय वानखेडे, जिल्हाध्यक्ष चेतन तायडे, संत रोहिदास प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.संपतराव वानखेडे, गुरू रविदास क्लबचे अध्यक्ष डॉ सुनील सूर्यवंशी, संत रविदास संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण खिरोडे, आदींच्या उपस्थितीत होती.

या कार्यक्रमाच्या सुरवातीस सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी वसंत सुरवाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामाजिक क्रांती व समतेचे प्रणेते गुरू रविदास, जाणता राजा शिवराय, थोर समासुधारक म.ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यारपण, दीपप्रज्वलन व गुरू रविदासांची महाआरती करण्यात आली. या वेळेस प्रमुख अतिथिंचे यथोचित स्वागत श्री.वानखेडे गुरुजी हौसिंग सोसायटीतील सभासदांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी गुरू रविदास यांच्या जीवन कार्याची माहिती प्रा.धनराज भारुळे, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी यशवंत ठोसरे यांनी देऊन संतांची शिकवण आचरणात आणण्याचे आव्हान केले.

या वेळेस नरोत्तमभाई परमार, साहेबराव ठोसर, दामोदर चव्हाण, सतीश शिंदे, संजय वानखेडे,आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय वानखेडे यांनी तर आभारप्रदर्शन अविनाश तायडे यांनी केले. गुरू रविदास जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री वानखेडे गुरुजी हौसिंग सोसायटीतील सर्व रहिवाशांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.