उत्तराखंडच्या हल्दवानी हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अखेर जेरबंद

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तराखंडच्या हल्दवानी जिल्ह्यातील बनभूलपुरा येथे 8 फेब्रुवारी रोजी हिंसाचाराची घटना घडली होती. या हिंसाचाराचा मास्टरमाईंड अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. उत्तराखंड पोलिसांचे प्रवक्ते आयजी निलेश भारणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा मास्टर माईंड अब्दुल मलिक यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी या हिंसाचारानंतर फरार होता आणि त्याचा शोध पोलिसांच्या अनेक पथकांकडून घेणे सुरू होते. पोलिसांनी आरोपी विरोधात लूक आउट नोटीस जारी केली होती.

विशेष म्हणजे अब्दुल मलिक याने हल्दवानीच्या सेशन कोर्टात अंतिम जामिनासाठी याचिका देखील दाखल केलेली आहे. यावर 27 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून अटक केली आहे. आरोपीच्या वकिलांनी सांगितले की, त्यांना माहिती मिळाली की अब्दुल मलिक याला दिल्लीतून अटक केली आहे. मलिक याचा हिंसाचारशी काहीही संबंध नाही. जेव्हा हिंसाचार झाला त्याच्या तीन-चार दिवसाआधीपासूनच तो हल्दवानीमध्ये नव्हता

 

Leave A Reply

Your email address will not be published.