३ नवे फौजदारी कायदे १ जुलैपासून देशभरात होणार लागू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इंग्रजांच्या राजवटी तयार झालेले आणि १८६२ पासून अस्तित्वात असलेले तीन फौजदारी कायदे नुकतेच केंद्र सरकारने बदलले आहेत. या तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी एक जुलैपासून देशभरात करण्यात येणार आहे सरकारने याबाबतच नोटिफिकेशन काढला आहे.

भारतीय साक्ष अधिनियम २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीचं केंद्रीय गृह मंत्रालयाने २३ फेब्रुवारी २०२४ रोजी नोटिफिकेशन काढला आहे.

या नोटिफिकेशन मुळे १ जुलै २०२४ पासून या तिन्ही कायद्याचे देशभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आता जनतेला, पोलिसांना तसेच कायद्याच्या अभ्यास करणाऱ्या वकिलांना या नव्या कायद्याची माहिती आणि अभ्यास करणे क्रमपात्र ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.