नागपुरात प्रेस फोटाग्राफरची गोळ्या झाडून हत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

नागपुरात सदर पोलीस स्टेशन हद्दीत राजनगर येथे एकाची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विनय पुणेकर असं मृतकाच नाव असून ते जुने प्रेस फोटोग्राफर असण्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विनय पुनेकर हे घरी एकटे असताना एक व्यक्ती आला आणि सायलेन्सर लावलेल्या बंदुकीने त्यांच्यावर गोळ्या झाडून पळून गेला.मयत पुनेकर यांनी प्रेस फोटोग्राफर म्हणून काम सोडून अनेक वर्ष झाले आहेत. दरम्यान त्यांच्या घरात घुसून काहींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्त्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.