जळगावात घरफोडी ; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ४० हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जळगाव शहरातील खोटे नगरजवळील वाटीका आश्रम परिसरात उघडकीस आली असून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोविंद सुकदेव पाटील (वय-५६) हे ९ मार्च रोजी त्यांनी राहते घर बंद करून बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ४० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे रविवारी १२ मार्च रोजी सकाळी ८ वाजता लक्षात आले. यानंतर तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. गोविंद पाटील यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोहेकॉ अनिल मोरे तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.