दगडाच्या सहाय्याने एटीएम मशीन तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
एटीएम मशीन दगडाच्या साहाय्याने तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला तालुक्यातील कानळदा येथे ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, ल कानळदा येथील बसस्थानक येथे स्टेट बँक ऑफ इंडीयाचे एटीएम असून रविवारी १२ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत एटीएम व्यवस्थित होते. दरम्यान, मध्यरात्री एकाने दगड मारून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी १३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेवून माहिती घेण्यात आली. पोलीसांनी पथक तयार करून कारवाईची सुचना देण्यात आली. त्यानुसार मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे एका संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.