गावठी कट्टा बाळगणाऱ्या कोल्हापूरच्या तरुणाला अटक

0

चोपडा ;- बोरज अजटी फॉरेस्ट नाक्यासमोर १३ हजर रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस बाळगणार्या कोल्हापूर जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणाला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध आर्म अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम प्रकाश सूर्यवंशी वय २२ रा. कोंडवाली जुने बस स्टेनसमोर ,गोकुळ हॉटेल ता. हात कंगले जि. कोल्हापूर हा तरुण १३ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस घेऊन फोरेश्ट नाक्या समोर आढळून आला. त्याला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे. तपास सपोनि शेषराव नितनवरे करीत आहे. .

Leave A Reply

Your email address will not be published.