अमेझॉन नंतर आता गुगल करणार कर्मचारी कपात !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गुगल कंपनी त्यांच्या डिजिटल, हार्डवेअर आणि अभियांत्रिकी विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. कंपनीने सांगितले आहे की, खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेताना आहे. Fitbit कंपनीचे सह-संस्थापक जेम्स पार्क, एरीक फ्रीडमन आणि इतर Fitbit कंपनीतील अधिकारी कंपनी सोडत आहे. Google ने २०१९ मध्ये Fitbit कंपनीचे २.१ बिलियन डॉलरमध्ये विकत घेतली होती.

Google प्रवक्त्याने एका निवेदनात म्हंटले की, “डीएसपीए (डिव्हाइसेस आणि सर्व्हिसेस) मधून काही शंभर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा सर्वात मोठा परिणाम हार्डवेअर टीमवर होत आहे. गेल्या वर्षी सुमारे १२,००० लोकांना कामावरून काढून टाकल्यानंतर गुगलने निवन कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. बिझनेस टुडेवर प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, Google आपल्या डिजिटल असिस्टंट, हार्डवेअर, आणि इंजिनिअरिंग टीममधील शेकडो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे. खर्च कमी करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कंपनी हा निर्णय घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.