गावठी कट्ट्यांसह दोन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

0

एमआयडीसी पोलिसांची कारवाई ; दोन दिवसात गावठी कट्ट्याच्या दोन कारवाया

जळगाव ;- शहरातील मेहरूण उद्यान येथे तीन जण गावठी कट्टे घेऊन फिरत असल्याच्या माहितीवरून दोन जणांना पोलिसांनी दोन गावठी कट्ट्यांसह ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्यांचा तिसरा साथीदार मात्र पळून गेला. दरम्यान 28 रोजी केलेल्या कारवाई मधे अरशद शेख हमीद उर्फ अण्णा रा गेंदालाल मिल जळगाव याच्याकडे अजिंठा चौफुली जळगाव येथे गावठी कट्टा मिळुन आला होता. याप्रमाणे दोन कारवाया करण्यात आलेल्या आहे.. एमआयडीसी पोलिसांनी गावठी कट्टे हस्तगत करून आरोपींना अटक केल्याच्याकेल्याची कारवाई केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती वसीम एम देशमुख यांनी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली सरकारतर्फ अॅडव्होकेट श्रीमती स्वाती निकम यांनी कामकाज पाहीले.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, 29 रोजी चे रात्री जे के पार्क मेहरुण बगीचा येथे तीन जण गावठी पिस्टल घेवुन फिरत असल्याची माहीती पोलीस निरीक्षकयांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी गेले असता दिपक लक्ष्मण तरटे( वय 26 वर्ष रा नागसेन नगर रामेश्वर कॉलनी जळगाव),अमन रशिद सैय्यद उर्फ खेकडा (वय 21 वर्ष रा सुप्रीम कॉलनी जळगाव )या दोघांना ताब्यात घेतलेतर त्यांचा विशाल राजु अहीरे हा पळुन गेला होता.दोन्ही आरोपींची अंगझडती घेतल्यावर दोघआंकडे दोन गावठी कट्टे आढळून आले.. तसेच बजाज पल्सर मो सा क्र. एमएच 19 डीयु 4565 असा एकुण १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल गावठी कट्टयासह मिळुन आला . पोका.किरण पाटील यांनी फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड पोउनी दिपक जगदाळे, पोउनी दत्तात्रय पोटे, सफौ. अतुल वंजारी, पोहेकॉ . सचीन मुंढे, पोहेका गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील, पोना, किशोर पाटील, पोना, सचीन पाटील, पोना, योगेश बारी, सुधीर सावळे, पोका. किरण पाटील, पोका, छगन तायडे, पोका. ललीत नारखेडे, राहुल रगडे यांनी केली आहे. सदर अमन रशिद सैय्यद उर्फ खेकडा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याच्यावर यापुर्वी एकुण 18 गुन्हे दाखल आहे तसेच दिपक लक्ष्मण तरटे यांच्यावर 4 गुन्हे दाखल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.