लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
जळगाव ;– गेल्या वर्षभरात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाची कामे जोरात सुरु असून तब्बल 85 टक्के कामे पूर्णत्वास आली असून उर्वरित कामे देखील लवकरच पूर्ण होती अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रपरिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून सर्व विभागांच्या बैठका देखील घेण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला 510 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी 497 कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे पूर्णत्वास आली आहेत. उर्वरित कामांच्या वर्कऑर्डर देखील निघाल्या असून हे कामे त्वरीत पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे. जिल्ह्यात वारकरी भवन उभारण्याचा श्रीगणेशा झाला असून त्याचा वारकरी बांधवांना लाभ होणार आहे. महिला, शेतकरी, युवक, कष्टकरी, अपंग, विधवा यांच्या संदर्भातील प्रकरणे देखील मंजूर करण्यात आली असून त्यांना प्रशासनाने मदतीचा हात दिला आहे.
निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
आगामी काळात होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून प्रत्येक मतदान केंद्रांना अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. दुगर्म भागातील 16 मतदान केंद्रांच्या अडचणी दूर करण्यावर भर देण्यात आला आहे. ोनच्या माध्यमातून तेथील अडचणी दूर करण्याचे प्रस्तावित आहे. उमेदवारांना यावेळी ऑनलार्इन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑफलार्इनही ही सुविधा कायम आहे. एका मतदारसंघात एक उमेदवार चार अर्ज दाखल करु शकतो.
जिल्हा विकास आराखडा सादर होणार!
जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यादृष्टीने नियोजन सुरु असून राज्याचे मुख्य सचिवांना दि. 6 मार्च रोजी जिल्हा विकास आराखडा सादर करण्यात येणार आहे. यात पर्यटन, कृषी, औद्योगिक, दळणवळण, विज वितरण, सिंचन, बाजारपेठ यांच्या समावेश असून विकासाला चालना देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी श्री. अंतुर्लीकर, तहसीलदार श्री. बनसोडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील व अधिकारी उपस्थित होते.