गौतमी पाटील सोबत घडला धक्कादायक प्रकार; वाचा सविस्तर

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव आज घर घरात पोहचले आहे. तर ते तिच्या घायाळ करणाऱ्या डान्स ने आणि मनमोहक अदांनी, याच गौतमी पाटील सोबत धक्कादायक बाब समोर आली आहे. गौतिमीचा एक कार्यक्रमांतर्गत बॅक स्टेज कपडे बदलत असताना तिचा एका अज्ञात व्यक्तीने चोरून व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. ही डान्सर ही कायमच चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमाला देखील मोठी गर्दी होत असते.

याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातुन संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. पुण्यातील (Pune) एका स्टेजशो दरम्यान कपडे बदलताना तिचा अश्लिल व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल केला जात आहे. वाढती लोकप्रियता पाहता आणि तिला बदनाम करण्यासाठी हा घृणास्पद प्रकार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत तिने भारती विद्यापीठ पोलीस (Police) स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.तिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने समाजाकडून संतापाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असून तिला सपोर्ट करण्यासाठी देखील नेटकरी पुढे आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.