हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात दोन जनावरे ठार; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा तालुक्यातील मोंढाळे प्र.अ.हिवरखेडे खू.शिवारादरम्यान बिबट्या किंवा एखाद्या हिंस्त्र प्राण्याने एक गाय व एक वासरू ठार केले आहे. यामुळे मोंढाळे व हिवरखेडे गावातील शेतकऱ्यांनमध्ये भितिचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा तालुक्यातील मोंढाळा व हिवरखेडे शिवारात मागील दोन दिवसांपासून हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात दोन जनावरे ठार झाली आहेत.यामुळे गावातील नागरिकांना आवाहन करण्यात येत कि आपल्या गावाच्या परिसरात बिबट्याने किंवा हिंस्त्र प्राण्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस कुणीही शेतात जाऊ नये व आपली गुर ढोर शेतातुन घरी घेऊन यावे असे आवाहन पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे तसेच या क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस बी देसले यांनी गावातील नागरिकांना आव्हान केले आहे.

घटनास्थळी वनविभागाचे प्रेमराज सोनवणे, सविता पाटील, रामदास वेलसे यांच्यासह वनपाल, वनमजूर यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर बिबट्या नाहीतर तडस किंवा इतर हिंस्त्र प्राण्याचे ठसे आढळून आले असून त्याचे छायाचित्रण करून ते तज्ञांना पाठवणार असून त्यानुसार ते बिबट्या किंवा तळस असल्याचे निष्पन्न होईल, सदर हिवरखेडे गावातील विजय ताथु पाटील यांची दिनांक २३ रोजी एक वासरी तसेच गोरख यादव पाटील यांचे दिनांक २४ रोजी सायंकाळी मोठी वासरी या हिंस्त्र प्राण्याने फस्त केली आहे. तर आणखी एका गाईवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर झालेल्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याभागात विहिरींना पाणी कमी असल्यामुळे व लाईट रात्रीची येत असल्यामुळे रात्री शेतकऱ्यांना शेतात पाणी भरण्यासाठी जावे लागते. सदर शेत शिवारालगत फॉरेस्ट जंगल आहे वन्य प्राण्यांचा हौदोस असुन रानडुक्कर, हरिण, कोल्हे, लांडगे, पाणघोडे, आदी प्राण्यांचा त्रास सुरूच असतो म्हणून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली
यावेळी मयत गाईचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी ही शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी हिंस्र प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी या भागात पिंजरा लावुन या हिंस्र प्राण्यांच्या बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे तसेच या भागात आता कॅमेरे बसविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.