डॉ. केतकीताई पाटील यांच्याहस्ते चोपडा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गोदावरी फाऊंडेशनच्या (Godavari Foundation) सदस्या तथा युवानेतृत्व असलेल्या डॉ.केतकी पाटील (Dr. Ketaki Patil) यांनी शनिवार, दि.२५ फेब्रुवारी रोजी चोपडा तालुक्यातील दौरा करीत ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार केला. चोपडा तालुक्यातील गोरलेगावले खु.खडगाव, सनपूले, हातेड खुर्द, कृष्णापुर, वटार, मोहरद ग्रामपंचायतींना दिवसभरात भेटी देऊन तेथील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन डॉ.केतकी पाटील यांनी सत्कार केला. तसेच भावी वाटचालीसाठी गावाच्या विकासासाठी शुभेच्छाही दिल्यात.

या दौर्‍याला ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला असून डॉ.केतकीताई पाटील यांचे स्वागतही यावेळी करण्यात आले. चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द येथील सरपंच देवकाबाई भिकन फुगारे, उपसरपंच हिरालाल युवराज कोळी, हातेड,ता.चोपडा येथील सरपंच शालिनी रमेश पाटील, उपसरपंच उज्वला सुनील पाटील, कृष्णापुर तालुका चोपडा येथील सरपंच पिनबाई गेमा बारेला, उपसरपंच उषाबाई राजेंद्र पाटील, तसेच वटार,ता.चोपडा येथील सरपंच बिकुबाई सुभाष ठाकरे, सनपुले ता.चोपडा येथील सरपंच प्रतिनिधी राजेंद्र पुंजू कोळी, उपसरपंच समाधान लक्ष्मण पाटील, खडगाव,ता.चोपडा येथील ग्रामपंचायत सरपंच कविता रवींद्र चव्हाण, उपसरपंच शालुबाई अरुण पाटील, मोहरद ता.चोपडा येथील सरपंच अंजुम रमजान तडवी, उपसरपंच सदस्य हफशानबाई यासीन तडवीयांच्यासह यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी गोरगावले खुर्द येथील सदस्य लक्ष्मीबाई आनंदा कोळी, ममता कल्पेश बोरसे, वंशाबाई आनंदा भिल, सुनिता प्रकाश मुरलीधर फुगारे,प्रकाश आनंदा फुगारे, ज्ञानेश्वर सुरसिंग भिल,दगडू सुराजी भिल, आनंदा फुगारे, तुकाराम पुंडलिक बोरसे, रोशन भिकन फुगारे, सुनील सिताराम बागुले, रवींद्र पाटील, सुनील वाघोली,दिलीप सिताराम बागुले, भागवत पाहूजी कोळी, प्रभाकर सिताराम कोळी, हातेड, ता.चोपडा येथील सदस्य सुलोचना राजेंद्र सोनवणे, विमल कैलास भिल, रमाकांत देवराज,सुनील बावस्कर, माजी सरपंच नथू रामदास तायडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर अहिरे, चोपडा तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष तथा उदय पीक संरक्षण सोसायटीची संचालक अनिल अमृतराव सोनवण, कृष्णापुर तालुका चोपडा येथील ग्रामपंचायत सदस्य शंकर बारेला, संजय नामदेव पाटील, गुलाब पठाण, राजेंद्र रघुनाथ कोळी तसेच वटार,ता.चोपडा येथील सदस्य विनोद वासुदेव ठाकरे, रत्नाबाई रमेश ठाकरे, शोभाबाई मोतीलाल पाटील,मोतीलाल पाटील, नाना राजेंद्र लटकन पाटील, जीवन बाळू ठाकरे,मुरलीधर हिरामण ठाकरे पाटील, जनार्दन घनश्याम पाटील, गोकुळ वामन बाविस्कर, सोमा देवराम बाविस्कर, भाऊसाहेब चिंतामण बाविस्कर, गोपाळ सुभाष ठाकरे,गुलाब बाळू ठाकरे , जीवन बाळू ठाकरे, बाळू दादा ठाकरे (माजी सरपंच), सनपुले ता.चोपडा येथील सदस्य वीरा सुरेश कोळी, ज्ञानेश्वर मोरे, पोलीस पाटील, वंदनाबाई ज्ञानेश्वर मोरे, दूध डेरीचे संचालक भगवान दौलत पाटील, ग्रामपंचायत सदस्य निर्मलाबाई दौलत पाटील, दूध डेरीचे संचालक प्रल्हाद तुकाराम पाटील, सदस्य राकेश नामदेव भिल्ल, कमलाबाई दौलत पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य शांताराम सोमा कोळी, नंदकिशोर शिवाजी पाटील, खडगाव,ता.चोपडा येथील रवींद्र नथू पाटील, सुनंदा दुर्योधन सोनवणे, गावचे पोलीस पाटील दत्तात्रय रतन पाटील, गावचे माजी उपसरपंच अमोल विठ्ठल पाटील, मोहरद ता.चोपडा येथील ज्येष्ठ व्यक्ती गंगाराम सखाराम पाटील, ज्येष्ठ नागरिक धना बुधा पाटील, नशिबा तडवी आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.