कुसुंबा शिवारातून चार कुलर , गॅस हंडी लांबविली

0

जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

 

एमआयडीसी परिसरातील हॉटेल शिवशाही येथील कुलर फॅक्ट्रीमधून येथून अज्ञात चोरटयांनी ४ कुलर आणि एक गॅसची हंडी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, अयोध्या नगर येथील रहिवाशी विशाल ढवळे यांचे कुसुंबा शिवार येथे शिवशाही नावाचे हॉटेल असून १४ रोजीच्या रात्री १२ वाजेनंतर अज्ञात चोरटयांनी १४ हजार किमतीचे ४ लोखंडी कुलर , १५०० रुपये किमतीची गॅस हंडी चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.