चाळीसगावात घरफोडीत ५८ हजारांचा ऐवज लंपास

0

चाळीसगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील एक बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी कपाटातून रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे ५८ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना येथे उघडकीस आली असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माथी अशी कि, चाळीसगाव येथील वघडु येथील रहिवाशी असलेल्या योगिता विजय पाटील यांच्या बंद गराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी घरातील कपाटामधून ३० हजार रुपयांची रोकड , २१ हजार किमतीचे सोने, ७ हजारांचे पैंजण असा एकूण ५८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेलयाचा प्रकार १४ रोजी उघडकीस आल्याने याप्रकरणी योगिता पाटील यांनी चाळीसगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना भूषण पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.