अक्षर पटेलने सांगितले ‘बापू’ या नावाचं सत्य, धोनीशी आहे संबंध

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

भारतीय संघात (Indian team) खूप साऱ्या खेळाडूंचे टोपण नाव आहे. टीम इंडियात रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) जड्डू, विराट कोहलीला (Virat Kohli) चिकू आणि अक्षर पटेलला (Akshar Patel) बापू या नावाने बोलवलं जातं. पण या सर्वांना टोपणनाव ठेवण्यामागे महेंद्रसिंह धोनीचा हात आहे. हो तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. आता अक्षर पटेलने स्वत: टिम इंडियात बापू का बोलतात यामागचा खुलासा केला आहे. तसेच महेंद्रसिंह धोनीने बापू नाव कसं पाडलं या मागचा रंजक किस्सा सांगितला आहे.

बापू नावामागे महेंद्रसिंह धोनी
अक्षर ने खुद्द खुलासा केला आहे. कि त्याला बापू का म्हणतात, बापू हे नाव महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) पाडल्याचं सांगितलं.“जेव्हा मी गोलंदाजी करत होतो, तेव्हा धोनीने विचारलं की तुला काय नावाने हाक मारू? अक्षर तर बोलू शकत नव्हतो. पटेल पण सांगता आलं नाही. मग काय बोलायचं हा प्रश्न पडला.”, असं अक्षर पटेलनं सांगितलं.“त्याच सामन्यात रवींद्र जडेजा पण खेळत होता. त्याला गुजरातमध्ये बापू संबोधलं जातं.तेव्हा महेंद्रसिंह धोनीला वाटलं प्रत्येक गुजराती बापू असतो. तेव्हापासून त्याने बापू बोलणं सुरु केलं. एकदा त्या नावाने हाक मारल्यानंतर इतर खेळाडू त्याच नावाने हाक मारू लागले.”, असं अक्षर पटेलनं पुढे सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.