असदवर प्रयागराज येथे अंत्यसंस्कार

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रयागराज येथील कासारी आणि मसारी स्मशानभूमीत गुंड अतिकचा मुलगा असदवर (asad ahmad encounter)) अखेर अंत्यसंस्कार पार पडले. त्याचा साथीदार गुलाम हसनला मेहंदोरी येथील स्मशानभूमीत दफन करण्यात आले. . अतिकच्या काही जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितील अंत्यसंस्कार पार पडले मात्र, माफिया अतिक अहमद (atiq ahmad) मुलाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहु शकला नाही.

प्रयागराजचे एसीपी आकाश कुल्हारी यांनी सांगितले की, असदच्या कुटुंबातील 20-25 जवळचे नातेवाईक येथे उपस्थित होते. असदच्या आजोबांनी असदच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली. यावेळी स्मशानभूमीबाहेरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ड्रोनद्वारेही नजर ठेवण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.