महाराष्ट्रात येत्या काही दिवसात वाढणार गारठा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीचा सत्र सुरू झाला आहे. ही थंडी आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणखी वाढणार असल्याचं समोर आला आहे. सध्याच्या परिस्थितीत देशात पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळे उत्तरेच्या राज्यांमध्ये होणाऱ्या पाऊस आणि बर्फ दृष्टीचे परिणाम जिल्ह्यातील हवामानावर होताना दिसत आहे.

सध्याच्या परिस्थितीत हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार नव्यानं सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंजावातामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांना पावसाचा तडाखा बसणार आहे. तर काही राज्यांमध्ये धुक्याची दाट चादर अनुभवायला मिळणार आहे. पर्वतीय राज्यांमध्ये हिमवृष्टीसह सुरुवात होणार आहे. तर कुठं सुरू असणारी हिमवृष्टी आणखी वाढणार असल्यामुळे उत्तरेकडील हे बदल राज्यांवर आणि संपूर्ण देशावर थेट परिणाम करताना दिसणार आहे.

राज्यात नाशिक पासून जळगाव पर्यंत आणि मुंबईपासून-कोकण पर्यंत अनेक भागांमध्ये पहाटेच्या वेळी तापमानात लक्षणीय घट होणार असून, ही घट येत्या काही दिवसांसाठी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. निफाडमध्येही तापमानाचा आकडा ९ अंशापर्यंत पोहोचू शकतो. तर पुणे-सातारा व कोल्हापुरातील डोंगराळ भागांमध्ये गारवारे थंडीची चाहूल येण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.