मोठी बातमी; स्मार्ट फोन होणार स्वस्त !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत सरकारच्या अर्थ विकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन गुरुवारी देशाचं अंतरिम बजेट सादर करतील, मात्र यापूर्वीच मोदी सरकारने देशवासियांना मोठ गिफ्ट दिला आहे. मोबाईल फोन उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या कंपोनंट्स आणि पार्सल वरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे शुल्क पूर्वी पंधरा टक्के होतं जे आता दहा टक्के करण्यात आला आहे. सरकारने जारी केलेल्या पत्रकानुसार सिम सॉकेट, मेटल पार्ट, सेल्युलर मॉडल्स, आणि अन्य मेकॅनिकल पार्टसवर लागणारे आयात शुल्क आता पाच टक्के कमी असणार आहे. यामुळे भारतात स्मार्टफोन उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आता भारतात कमी किमतीमध्ये स्मार्टफोन तयार होणार आहे. यामुळे ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोनच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सॅमसंग-ॲपल
‘मेक इन इंडिया’ अभिनयामुळे कित्येक जागतिक कंपन्या भारतात स्मार्टफोनचे उत्पादन घेत आहे. आपण आणि सॅमसंग या दिग्गज कंपन्यांनी आपले नवे मॉडेल्स भारतात तयार करण्यास सुरुवात केली आहे. आयात शुल्क कमी झाल्यामुळे आता या मोठ्या कंपन्यांचे भारतात तयार केलेले स्मार्टफोन देखील स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.