सुगंधित पानमसाला आणि तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एकावर गुन्हा

0

जळगावः – शहरातील राजकमल टॉकीज जवळील भावना किराणा दुकानासमोरून दुचाकीने अवैधरित्या सुगंधित पानमसाला आणि तंबाखूची वाहतूक करणाऱ्यावर शनिपेठ पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. ही कारवाई मंगळवार दि. ३० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास केली, याठिकाणाहून ४६ हजार ६२० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी राजेश गुरुमुखदास रामचंदानी (वय ४७, रा. संधी कॉलनी) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील राजकमल टॉकीज जवळील भावना किराणा दुकानासमोर एकजण (एमएच १९ एडब्ल्यू ८०४७) क्रमांकाच्या दुचाकीवरुन बेकायदेशीररित्या सुगंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी घेवून जात असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांच्यासह अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी शरद पवार हे पथकासोबत कारवाईसाठी रवाना झाला. या पथकाने राजकमल टॉकीज परिसरात जावून त्याठिकाणी दुचाकीवरुन गुटख्याची वाहतुक करणाऱ्या राजेश गुरुमुख दास रामचंदानी (वय-४७, रा. सिंधी कॉलनी) यांची तपासणी केली. त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीतून एक पाकीट काढले असता त्यामध्ये सुगंधित पान मसाला, सुगंधित तंबाखू आढळून आले. दरम्यान अन्न व औषध प्रशासन व शनीपेठ पोलिसांनी कारवाई करत त्याच्याजवळ असलेला २६ हजार ६२० रुपये किमतीचे सुगंधित पान मसाला व तंबाखू आणि २० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ४६ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारीशरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राजेश गुरुमुखदास रामचंदानी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.कॉ. योगेश माळी हे करीत आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांच्यासह शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस उपनिरीक्षक योगेश टिकले, पोलीस कॉन्स्टेबल गिरीश महाजन, अश्विन हडपे, राहुल घेटे, मुकुंद गंगावणे यांनी ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.