Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अमळनेरमध्ये 2 लाख 30 हजारांचा गांजा जप्त, एकास अटक
    गुन्हे वार्ता

    अमळनेरमध्ये 2 लाख 30 हजारांचा गांजा जप्त, एकास अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 23, 2022No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अमळनेर बसस्थानकच्या परिसरातून सुमारे 2 लाख 30 हजार रुपयांचा गांजा पोलीसांनी जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दोन व्यक्ती बेकायदेशीररित्या गांजाची अमळनेर बसस्थानक परिसरातून वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. या गुप्त माहितीनुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजेंद्र कोठावदे, पोहेकॉ किशोर पाटील, पोलीस नाईक दीपक माळी, रवींद्र पाटील, मिलिंद भांबरे, सूर्यकांत साळुंखे, सिद्धांत शिसोदे, पोकॉ हर्षल पाटील, विलास बागुल यांनी गुरूवारी २२ डिसेंबर रोजी रात्री अमळनेर बसस्थानक परिसरात छापा टाकला.

    या छाप्यात सुमारे 2 लाख 30 हजार रुपये किमतीचा 15 किलो 566 ग्रॅम वजनाचा ओला गांजा जप्त केला असून या कारवाईत राधेश्याम रामसिंग पावरा रा. हिसाडे ता. शिरपूर जि. धुळे याला ताब्यात घेतले. दरम्यान दुसरा साथीदार सुरेश साहेबराव भदाणे रा. हिसाळे ता. शिरपूर जि.धुळे याने पळ काढला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेतील राधेश्याम पावरा याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    #amalner #ganja crime news Ganja seized in Amalner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif