चाळीसगावात दीड लाखांचा गांजा पकडला

0

चाळीसगाव;- शहरातील गोपालपुरा आणि नागद रोड येथील झोपडपट्टी भागात सुमारे दीड लाख रुपये किमतीचा तीन किलो 314 ग्रॅम गांजा चाळीसगाव शहर पोलिसांनी पकडला असून याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की 9 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चाळीसगाव शहरातील गोपालपुरा भागात आरोपी मांगीलाल मुरलीधर गुजर वय 54 रा.गोपालपुरा याच्याकडे एका प्लास्टिकच्या गोणीत 446 ग्रॅम गांजा 680 रुपये रोख आणि आरोपी नसिबी अश्रफ अली वय 55 वर्ष रा. नागद रोड झोपडपट्टी चाळीसगाव यांच्या घरात निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत 36 हजार 320 रुपयांचा एक किलो ८६८ ग्रॅम गांजा 87 हजार 890 रुपयांचा गांजा असा एकूण एक लाख 52 हजार 770 रुपयांचा तीन किलो 314 ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच ८८,५७० रुपये रोख आरोपींकडून जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी वरील दोघांनी गांजा विक्रीसाठी संशयित पिंटू पवार आणि साजन लंगड्या (पूर्ण नाव गाव माहित नाही) यांना गांजा विक्रीसाठी नेमले होते. त्यांच्यावरही चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी तपास करीत आहे. दरम्यान आरोपी मांगीलाल गुजर आणि नसीम बी अश्रफ अली या दोघांना अटक करण्यात आले असून पिंटू पवार आणि साजन लंगड्या हे फरार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.